गोमायू नावाचा एक कोल्हा तहान-भुकेने व्याकूळ होऊन इकडेतिकडे भटकत भटकत जंगलात जाऊन पोचला. तिथे त्याने दोन सेनांची युद्ध भूमी पाहिली आणि हवेमुळे वाजणार्या नगार्याचा आवाज ऐकला. तेव्हा तो शांत डोक्याने विचार करू लागला, "अरे बापरे!! या भयानक आवाजाने घाबरून मी पळून जाऊ की माझ्या पूर्वजांचं हे जंगल सोडून जाण्याआधी या आवाजाचं रहस्य जाणून घेऊ."
असा विचार करून तो हळूहळू पुढे सरकला आणि त्याने समोर पडलेला नगारा पहिला. त्याने कुतुहलाने त्या नगारा वाजवला आणि विचार करू लागला, वा वा!! खूप दिवसांनी मला मस्त भोजन प्राप्त झालं आहे. हा नक्कीच रक्ता-मांसाने भरलेला असणार."
कोल्हयाने असा विचार करून आपल्या दातांनी नगार्याचं सुकलेलं चामडं फाडलं आणि तो आत शिरला. नगार्याचं चामडं फडताना त्यांचे काही दातही तुटले. आणि आता काय मिळालं!! तर फक्त लाकूड आणि चामडं
म्हणूनच म्हणतात, "निव्वळ आवाजावरून कोणाच्या खर्याखोट्याचा अंदाज नाही लावता येत."