इला आणि बुध यांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव पुरुरवा होतं. पुरुरावा ने आपले पिता चंद्र यांच्या नावे चंद्र वंशाची स्थापना केली. आणि इलाच्या पश्चात ते राजा बनले. पुरूरव्यामध्ये देवसुलभ गुण होते आणि ते प्रचंड बलशाली आणि प्रतापी राजा होते. पुरुरवानी शंभर अश्वमेध यज्ञ करून स्वतःला देवांप्रमाणे यशोबल धारी बनवले होते. तिन्ही लोकांत पुरूरावाच्या शौर्यगाथा गायल्या जाऊ लागल्या. त्यामुळे प्रभावित होऊन देवांचा राजा इंद्रानेही पूरुरवा बरोबर मैत्री केली आणि असुरांविरुद्धच्या लढाईत अनेकवेळा त्यांचं समर्थन मिळवलं