वैवस्वत मनु आणि महाराणी श्रद्धा यांना बरीच वर्ष संतती नव्हती. म्हणून पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी महर्षि वसिष्ठांच्या उपदेशानुसार, भगवान मित्र आणि वरुण यांची उपासना करण्याचा निर्णय घेतला. वसिष्ठ ऋषींच्या पाठबळामुळे मनूने पुत्रेष्टि यज्ञ करण्याचं ठरवलं. त्याने भगवान मित्र आणि वरुण यांच्याकडे आपल्या वंश पुढे चालावा म्हणून पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली होती, परंतु विधिलिखित काही वेगळंच होतं.